आपल्यायला काय वाटत!आपली मुले चांगली व्हावी,यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे
८ मे, २०१२
काही सत्य पालकांसाठी
"आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या सगळ्या भावभावना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या वाडीतले काही टप्पे पाह्रच रंजक आहेत .ज्या मुलांचे पालक/शिक्षक त्यांना मोठ्यादा गाणी /गोष्टी म्हणून /वाचून दाखवतात आणि तसचं त्याच्यांशी सतत संवाद साधतात त्या मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होतो .
मुल भाषा कशी शिकत आणि त्यात मेंदूची भूमिका काय असते हे तपासायचं ठरवल तर वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जी मुला किमान दोन भाषा शिकतात त्या मुलांच्या मेंदूची रचना एकच भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदू पेक्षा थोडी वेगळी असते.
ज्या मुलांना लहानपणी ताणतणाव भांडण असे वातावरण अनुभवायला लागत त्या मुलांची अध्ययन क्षमता कमी होते .
तसेच लहानपणी आपल्या घरात मुलांना प्रोत्साहीत करणारे वातावरण असेल तर शिकण्याची क्षमता २५% नं जास्त वाढते अस संशोधनान सिद्ध झालय."
तेव्हा सुजाण पालक हो आता तरी आपल्यला जागे व्हायलाच हवे,
लहान मुला / मुली समोर काय बोलावे काय टाळावे ह्याचा बोध व्हायला हवा तसेच जेव्हडं जमेल तसं आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्या पाल्याशी संवाद साधुयात.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)