आपल्यायला काय वाटत!आपली मुले चांगली व्हावी,यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का? पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !! "पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ" आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहे
६ डिसेंबर, २०१२
संस्कार.......एक द्विधा ??
संस्काराचं बाळकडू ..
बालपणीच पाजलेले..
आज मात्र समाजात,
संस्काराचे "बारा" वाजलेले..
समाजात फिरताना जाणवतो,
संगतीचा भारी पगडा...
इकडेच सुरु होतो,
'संस्कार - संगत' झगडा..
मौल्यवान शिक्षणाचे सध्याचे..
समाजातले "दर" पाहून,
'डॉक्टर' , 'इंजिनिअर' अशा "सेवाभावी" इच्छा..
मनातच जातात राहून.,,
आजचे "कॉर्पोरेट विश्व" म्हणजे..
संस्कार जपण्याची बॉर्डर,
कारण क्वालिटी डावलून,
"बार" मध्ये साईन होतात पर्चेस ऑर्डर..
विवाह संस्था ह्या पवित्र प्रथेचे..
बदललेले इक्वेशन.....म्हणजेच
स्वातंत्र्याच्या "स्पेस" साठी...
सजवलेले "लिव इन रिलेशन"
अनेक उदाहरणे देऊन गायली जाते...
नारी शक्तीची गाथा,
सोयीनुसार संस्कारांना डावलून
रुजवली जात आहे...."स्त्री-भ्रूण" हत्येची प्रथा..
"मोठा झाल्यावर नक्की सांभाळेन..."
ही बालपणीच्या संस्काराची भाषा..
अर्थार्जनाच्या हव्यासापोटी पालकांना दाखवते..
एकटेपणा अथवा वृद्धाश्रमाची दिशा..
समाजातल्या अशा विरोधाभासाने,
होऊन देऊ नका स्वतःची "द्विधा"..
बुद्धीचा कस पणाला लावून..
विचारांचा सुवर्णमध्य साधा.
चांगले संस्कार आणि स्वतःचे विचार
यांचा अचूकपणे घाला मेळ...
आनंदाने जीवन जगण्याचा,
मग रंगात येईल खेळ..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवायशोधन
आपल्या सारख्या लोकांच्या प्रतिक्रिया हाच आमच्या साठी आनंद .
आपला हि ब्लॉग वाचतोय आता .
दत्तप्रसाद बेंद्रे