३० ऑगस्ट, २०१३

सुजाण पालकत्व

आपण पालक होतो हा एक प्रकारचा बहुमानच आपल्याला मुल झाल्यामुळे मिळालेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या मुलाचे आभार मानायला हवेत. त्याचामुलेच आपण आई किंवा बाबा झालेलो असतो. जसे तुझ्यामुळे मी झाले आई , बाळा होऊ कशी उतराईहे तर ऐकूण काय मुलं आणि पालक या नात्यातील अंतर कमीतकमी असायला हवं. हे नाते संबंध पाळताना काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत ते पाहू .




        मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक आईहाच असतो . किंवा पालक जो कोणी असतो तो . आई असल्याचा विलक्षण अभिमान तिला असतो . नकळतच तिचं हे जगणे  आनंदमयी होऊन गेलेले असते. त्याच्या आईह्या संबोधनाने पुकारण्याचा त्या कोवळ्या जीवावरून ती आपला जीव ओवाळून टाकत असते . ह्याच उच्यारांसाठी तिचे कान आतुरलेले असतात.ती धन्य झालेली असते . भूक लागली कि रडायचे हे काय आई किंवा पालक शिकवीत नाही . प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण मुलांना देतो . तो ओळखायला ती अंतप्रेरणेने शिकतात . त्याच अंतप्रेरणेतून ती ईतरही गोष्टी शिकतात . मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा   आय क्यू ओळखून मुलांच्याकडून त्या प्रमाणात अपेक्षा केली पाहिजे . मुलांच्या मेंदूची वाढच मुले ३ वर्ष होईपर्यंत झालेली नसते.हे ओळखून त्याच्या शरीरिक वाढीसाठी आणि मग मानसिक वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. ३ वर्षापर्यंत तरी मुलं डोक्यावती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत पाठपुरावा , धाकदाखून शिकवू पाहणारे पालक , आणि प्रथम आपण कृती करून त्यातून चांगल्या गोष्टी उचलणारे मुलं ह्या दोन्ही परस्पर्विरोधी गोष्टी आहेत . परंतु मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात . उत्तम मुल , उत्तम विद्यार्थी , किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात . आपल्या सर्व गोष्टींचे मुलं निरीक्षण , बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं न्याहाळत असतात . आणि त्यातूनच मुलं घडत असतात . त्या निरीक्षणातूनच त्यांच्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होत असतो . म्हणजेच पर्यायाने आपली जबाबदारी फारच वाढलेली असते . आपली प्रत्येक कृती , मग ती अगदी छोटोशीच का असो . चांगल्याची , पवित्रपणाची, प्रमानिकपणाची, प्रेमाची, स्नेहाची , त्यागाची, बुद्धीची असायला हवी . मुख्य म्हणजे त्यांचा सदगुण वाढीस लावणे हे पालकांनी करायला हवे . खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास म्हणजेच मानवतेचा विकास आहे . ह्या गुणामुळे तो मोठा होतोच पण सामाज्यासाठी आणि देशासाठी त्याच्याकडून चांगले कार्य घडते . त्या गुणामुळेच सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो . त्याच्या सहवासात आनंदच मिळतो . हे कशामुळे शक्य झालेले असते तर चांगल्या गुणांची जोपासना करायला हवी.पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये . कारण त्यांचे हे दिवस परत येनारे नसतात. त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते . कावळा दिसला कि हातातले बिस्कीट पुढे करणारे मुल हे उपजतच अंतप्रेरणेने होत असते . हि त्यांची भावना वाढीस लावण्याचे काम पालकांनी करावयाचे असते . एक तीळ सात जणांनी वाटून खायचा हे जपणारी आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांकडून चालू ठेवायची , दिल्याने आनंद वाढतो हे पालकांनीच मुलांना शिकवायचे असते . अगदीच हटी् मुलं असेल तर रागवायचे पण ते कौशल्याने त्यांचा अहंकार दुखावणार नाही या बेताने.
खरं म्हणजे निरोगी मन असते .पण आधी शरीर निरोगी असायला हवे.तरच मन प्रसन्न ताजे-तावाने राहते . आणि ते शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी पालकांची असते . मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता हवी . सर्व प्रकारचे अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते . असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे . त्यांना सगळ्या चवींची गोडी लावण्याचे काम आईचे आहे . ॠतुमानानुसार खाण्यात बदल करायला हवा . थंडीच्या दिवसात तेलाचे करायला हवे . थंडीचा ४ महिन्यात जर लक्षपूर्वक आहार विहार ठेवला तर पुढचे ८ महिने निर्धास्त राहायला हरकत नाही . अशी जुनी पिढी सांगत असते . त्यांच्या सांगण्याचं तथ्य तसेच झोपविश्रांती हि सुद्धा पूर्ण झालेली असेल तरच ते मुल तरतरीत दिसते . नाहीतर ते अथरुनातूनच रडत उठते . म्हणजे त्यांचे काहीतरी बिघडलेले असते हे पालकांनी ओळखायला हवे . निरोगी विचारच पुढच्या आयुष्यातील काम सोपे करतात . मुलांच्या मनात जिव्हाळा आणि कृतक्षता या दोन्ही भावना वाढीस लावायच्या त्या रुजवल्या कि आपोआप वाढीस लागतात . कारण या दोन भावनाच आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी, सामाजाशी आणि पर्यायाने विश्वाशी नातेसंबंध जिवंत ठेऊ शकतात . माणुसकीने वागल्यामुळे त्याचे थोरपण ठरत असते . आणि मग ते मुल कुणाचे आहे , याची विचारणा होते . पर्यायाने संस्कारातून या गोष्टी पुढे जाऊ शकतात . उत्तम संस्कार माणसाला मोठे करतात . शिक्षणाने जसा अज्ञानाचा अंधकार दूर होतो . तसे माणसाने आपल्यातले माणूसपण टिकवायचे असते . माणुसकी हि खरी जात आहे . हे माणसाला कळले पाहिजे .
       एकविसाव्या शतकातली गतिमानता नवीन नवीन रोगांना आमंत्रण देते . एवढेच नव्हे तर पूर्वी म्हतारपणी होणारे रोग तरुणपणात व्हायला लागलेत . तेव्हा चंगळवादामुळे हे घडते . आळसामुळे रोगाची मुळे शरीरात जोर धरू लागतात . आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसेल तर पुढील पिढीत असेच चित्र दिसेल . म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे . आणि ते आपल्यापासूनच ॠढ व्हायला हवे . ताण-तणाव नको म्हणून आई वडिलांचे निकोप नाते हवे . कारण मुल जास्त वेळ घरात असते . तीथें ते निर्भय असते . त्यांचा कोणत्याही तऱ्हेचा कोंडमारा होता कामा नये . नंतर मोठे झाल्यावर त्यांची मित्र-मंडळी कशी आहेत , याच्यावर पालकांचे लक्ष हवे . ती सुदधा चांगल्या संस्कारांच्या घरांतील मुले आहेत कि नाही हे पालकांनी तपासायला हवे . मुळे खोटं बोलत नाही ना ? कोणत्याही प्रकारची लबाडी मुळे करत नाही ना ? याकडे पालकांचे विशेष लक्ष पाहिजे . वडिलांचे मुलाशी मित्रासारखे नाते हवे . आईचे मुलीशी मैत्रीनिसारखे नाते हवे . पालकांचे वागणे पारदर्शी पाहिजे. / मुळे आपोआप शहाणी होतात . आनंद देतात . त्यांच्यातला कलागुण ओळखून त्याला योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे . त्यांच्या चुकांबद्दल योग्य समज देणे , चांगल्या कामगीरीबद्धल शाबासकी देणे . या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे . मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे . आपले आदरयुक्त प्रेम असेल तर मुळे अपोअपच पालकांना आपले आदर्श मानतात .
       दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी मुल यात गुरफटलेली स्त्री आपल्या मुलाकडे न थकता लक्ष देते . हे तिचे खरे कौशल्य आहे . त्याच्या चौकसबुद्धीला खात-पाणी घालते . मुळे फक्त अभ्यासात हुशार असली पाहिजे असे नव्हे , तर त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे . व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान पालकांनी शिकवले पाहिजे . त्यांचा अपमान करू नये . त्यांना चांगल्या शब्दात समाज द्यावि . मोठ्या माणसांशी कसे वागावे हे लहानपणीच शिकवावे .
आई हि सुसंस्कारांची जननि आहे . आईच्या प्रत्येक कृतीत , प्रत्येक शब्दात , प्रत्येक सल्ला व उपदेशात सुसंस्कार व नैतिक मूल्य भरलेली असतात . आई, वडील, शाळा, गुरु हे संस्कारांचे अधिष्ठान आहे . गुरु, विद्या संभाषन नेतृत्व असे विविध पैलू शिष्यावर पाडत असतो . चांगल्या नेतृत्वाची समाज्यात गरज आहे . आणि चांगल्या नेतृत्वाची समाज कदर पण करतो समाज जर समृद्ध आणि सकस हवं असेल तर हे बाळकडू लहानपणीच मुलाना पाजावे लागेल.  घरातील नात्यामधील जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद , सुसंस्कार आपलेपणा , एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती यामधून मुलानमध्ये आनंदाचे झाड जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे . मुलांनी खूप मोठ्मोटया पदव्या घेऊन खूप पैसे कमावण्यापेक्षा साधे राहून एकमेकांवर प्रेम करून दुसऱ्यांच्या गरजेला साहाय्य करून ,धाउन जाऊन अशा आशीर्वादात जगलं पाहिजे . अलीकडे एकमेकांशी सुसंवाद संपल्याची खंत वाटते ,त्यामुळे स्वभावात तुटकता अलयाचे जाणवते , एकटेपणा आवडतो , त्यामुळे स्वार्थी दृष्टी बनते . हे पालकांनी सांभाळले पाहिजे . तुकाराम महाराज म्हणतात मना करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण” , मन मुळात प्रसन्न पाहिजे मग जग जिंकल्याचा अनंद मिळेल . उत्साह, सकारात्मक जगण्याची वृत्तीच आनंदि ठेवते . उपासना कशासाठी आहे, मनाच्या स्वास्थासाठी कोणतीही उपासना करा . मन स्थिर आणि आनंदी राहण्यासाठी या गोष्टी आहेत . जसे योग आणि ध्यानधारणा यासुद्धा आनंदी जीवनासाठी उत्तम आहेत.  मुलांमध्ये या आवडी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत . वाचनाची आवड रुजवली पाहिजे . शिस्त , काटकसर , वेळेचे नियोजन या गुणांमुळे मुले नकिच यशस्वी होतील . मुलांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा पालकांना आणि कशाचीच अपेक्षा नसते . आपली ऐपत असली तरी मुलांना मागितली वस्तू कि लगेच देऊ नये . त्यांना पैशाची , वस्तूची किंमत राहत नाही . अपण सारेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो . त्यांच्या सुखासाठी क्षण-क्षण वेचीत असतो . त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला प्रत्येक आनंद सुख बलिदान करीत असतो . तेच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले असते . याची जाणीव ठेऊन त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांना आपुलकी , प्रेम , सुरक्षा मिळणे हाच त्यांचा अधिकार असतो . तो देणे आपले कर्तव्य आहे . आजी आजोबांचे प्रेम त्यांना मिळावे हि धडपड प्रत्येक आई वडिलांनी केली पाहिजे . ते सुधा आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतात. सोईच्या दृष्टीने ते वेगळे राहत असले तरी त्यांच्याशिवाय आपले कुटुंब अर्धावर आहे . अपुरे आहे . याची जाणीव हवी . आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे जसे लक्ष देता तसेच आपल्या आई वडिलांच्या मानसिक गरजा भागविणे त्यांची देखभाल करणे त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे .
नाती वडिलांकडील किंवा आईकडील असो . सारीच मैत्रीची असावीत जीवनासाठी ती गरजेची आहे.उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी योग्य मानसिक विकासासाठी सुख  शांती,समाधानासाठी,सर्वांशी उत्तम संबंध असणे आवश्यक आहे . शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईक सर्वांशी प्रेमाने असावे म्हणूनच अडूपण विसरून सर्वांशी स्नेहसंबंध मजबूत करायला हवे . मुलांना हे नात्याचे मोल समजून द्यायला हवे . आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार आहे . 
भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ती वाढविणे आणि तिची जोपासना करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा